*वाचन प्रेरणादूत- श्री विक्रम अडसूळ (राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते तसेच ATM राज्यसंयोजक)*
आनंदाचा ,गोडव्याचा, समृद्धीचा ,समाधानाचा, कौतुकाचा,आभाराचा दिन हा
वाचन प्रेरणेचा.
भारताचे वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि राष्ट्रपती या सर्व पदावर काम करणारे थोर भारतीय ,प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण सर, पदवीधर शिक्षक रामेश्वर जाधव सर, संगिता गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.शाळा धामणगाव येथे वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत धामणगाव चे सचिव अडसरे भाऊसाहेब लाभले.
सीमा गायकवाड मॅडम यांच्या सुंदर फलकलेखनाने धामणगाव शाळेतील प्रत्येक कार्यक्रमाचे फलकलेखनाने कार्यक्रमाची शोभा वाढवित आलेल्या आहेत तसा आजही उत्कृष्ट फलकलेखन केले. आजच्या कार्यक्रमाला मान्यवरांच्या उपस्थितीने ,राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला ता कळंब जि उस्मानाबाद यांच्या पुस्तक भेटीने आणि हात धुवा दिनाच्या निमित्ताने त्याच्या प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणाने धामणगाव शाळेत वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांना आजच्या दिनी प्रेरणा मिळावी म्हणून एखाद्या प्रेरणादायी व्यक्तीचे मार्गदर्शन आपण घेऊयात असे धामणगाव शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सीमा गायकवाड यांनी सुचवले . आमच्या सर्व टीमने या उपक्रमाला होकार देत सकारात्मक प्रतिसाद नोंदविला. नम्रता जानराव मॅडम, राधिका चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांना काही शालेय ग्रंथालयातील पुस्तके खुली करत विद्यार्थी वाचनाकडे कटाक्षाने लक्ष देऊन होत्या.
व्यक्ती वाचन, लेखनाने आणि बुद्धिमान व्यक्तीच्या सानिध्यात माणूस समृद्ध होत असतो म्हणूनच म्हणतात ना,
One who reads, writes, sees, inquires, lives in the company of learned, his intellect expands as the lotus petals expands due to the rays of sun.
आम्हीही हाच उद्देश समोर ठेवून मुलांनी प्रश्न विचारावेत, बुद्धिमान माणसाच्या सानिध्यात राहता यावे ,मुलांना वाचनाची व लेखनाची प्रेरणा मिळावी यासाठी यावर्षी चे महाराष्ट्रातील एकमेव असणारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक तसेच महाराष्ट्रातील उपक्रमशील ,कृतिशील शिक्षकांना Active Teachers Maharashtra (ATM ) च्या माळेत गोवणारे ATM चे राज्यसमन्वयक मा.श्री विक्रम अडसूळ सर यांच्या सोबत जि.प.प्राथ.शाळा धामणगाव येथील शिक्षक अन विद्यार्थी यांना Zoom Meeting च्या माध्यमातून प्रेरणादायी, सकारात्मक आणि एकमेकांची शैक्षणिक ऊर्जा वाढविणारा संवाद साधता आला.
मला आणि सीमा गायकवाड मॅडम यांना
विक्रम अडसूळ सरांचा अगोदरपासूनच परिचय आहे पण धामणगाव च्या शाळेतील इतर शिक्षकांचा परिचय व्हावा म्हणून नवसरे यांनी सर्वांची ओळख करुन दिली.
आजच्या वाचन प्रेरणादिनी विक्रम सरांनी धामणगाव शाळेतील विद्यार्थ्यांना वाचन ,लेखन, शिस्त याबद्दल छान मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विक्रम सरांना लहानपणापासून आत्तापर्यंतचे अनुभव, कौटुंबिक, शैक्षणिक आणि समाजिक वातावरण ,पुरस्काराचा आनंद, वाचनाचा छंद ,अतीव सुख आणि दुखाचे क्षण असे अनेक प्रश्न विचारुन त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इयत्ता पाचवीच्या पूजाने सर मला शिक्षणासाठी दत्तक घ्यायला तुम्हाला आवडेल का? असे विचारल्यावर सरांनी ही सकारात्मक दाद दिली .
विक्रम सरांनी विद्यार्थी अन शिक्षकांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा देत वाचन करा,अभ्यास करा ,खुप मोठे व्हा अशा शुभेच्छा दिल्या.
आमचे मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण सरांनी विक्रम सरांसोबत पुरस्काराची पद्धती, पुरस्कारावरासाठीच्या बाबी आणि इतर बाबीवर सविस्तरपणे चर्चा केली.
सर्वांना जिंकून घेत विक्रम सरांनी आमच्या विद्यार्थी अन शिक्षकांसोबत साधलेला संवाद हा आमच्यासाठी दिशादर्शक असणार आहे .
* ज्ञानदेव नवसरे*
धन्यवाद 🙏🏻
