थोरांची ओळख

माहिती मिळवण्यासाठी नावावर क्लिक करा

तुकडोजी महाराज


संत तुकाराम

संत ज्ञानेश्वर

सर्वपल्ली_राधाकृष्णन

सुभाषचंद्र_बोस

गाडगे_महाराज

लालबहादूर_शास्त्री

डॉ._बाबासाहेब__
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

      ╭════════════╮

      ▌     _*महात्मा फुले*_ 
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
✳ _*जोतीराव गोविंदराव फुले*_✳

_*जन्म:-*_११एप्रिल१८२७

कटगुण, सातारा,महाराष्ट्र

_*मृत्यू:-*_२८नोव्हेंबर १८९०

पुणे, महाराष्ट्र

_*संघटना:-*_ सत्यशोधक समाज


_*प्रभाव:-*_थॉमस पेन


_*प्रभावित:-*_डॉ. बाबासाहेब आंबेडकर


_*आई:-*_ चिमणाबाई फुले


_*पत्नी: -*_सावित्रीबाई फुले


_*अपत्ये:-*_ यशवंत

*✺◈◈◈◈✺●★MSP★●✺◈◈◈◈✺*

```जोतीराव गोविंदराव फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. येथील जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती; जनता त्यांना महात्मा फुले म्हणे.```

*✺◈◈◈◈✺●★MSP★●✺◈◈◈◈✺*

♻ _*बालपण आणि शिक्षण*_ ♻


```जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.```

*✺◈◈◈◈✺●★MSP★●✺◈◈◈◈✺*

🔰 _*शैक्षणिक कार्य*_  🔰


```महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.```


_“ विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।_

_नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।"_

```बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली.जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.```

*✺◈◈◈◈✺●★MSP★●✺◈◈◈◈✺*

⚜ _*सामाजिक कार्य*_  ⚜


```मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्‍याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्‌र्‍याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.```

*✺◈◈◈◈✺●★MSP★●✺◈◈◈◈✺*

📝 _*सत्यशोधक समाज*_ 📝


```२४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.```

*✺◈◈◈◈✺●★MSP★●✺◈◈◈◈✺*

📖 _*साहित्य आणि लेखन*_ 📖


```'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.```

*✺◈◈◈◈✺●★MSP★●✺◈◈◈◈✺*

📚 _*सन्माननीय उपाधी व लेखन*_  📚


```जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.```


_*साहित्य:-*_

इ.स.१८५५ नाटक तृतीय रत्न
जून, इ.स. १८६९ पवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा
जून इ.स. १८६९ पवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी
इ.स.१८६९ पुस्तक ब्राह्मणांचे कसब
इ.स.१८७३ पुस्तक गुलामगिरी
सप्टेंबर २४ , इ.स. १८७६ अहवाल सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत
मार्च २० इ.स. १८७७ अहवाल पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
एप्रिल १२ , इ.स. १८८९ निबंध पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ
२४ मे इ.स. १८७७ पत्रक दुष्काळविषयक पत्रक
१९ ऑक्टोबर इ.स. १८८२ निवेदन हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
१८ जुलै इ.स. १८८३ पुस्तक शेतकऱ्याचा असूड
४ डिसेंबर इ.स. १८८४ निबंध महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणीविषयीचे मत
११ जून इ.स. १८८५ पत्र मराठी ग्रंथागार सभेस पत्र
१३ जून इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक १
ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक २
१ ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक इशारा
२९ मार्च इ.स.१८८६ जाहीर प्रकटन ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर
२ जून इ.स. १८८६ पत्र मामा परमानंद यांस पत्र
जून इ.स. १८८७ पुस्तक सत्यशोधक सामाजोक्त मंगलअष्टकासह सर्व पूजा-विधी
इ.स. १८८७ काव्यरचना अखंडादी काव्य रचना
१० जुलै इ.स. १८८७ मृत्यू पत्र महात्मा फुले यांचे उईलपत्र
इ.स. १८९१ (प्रकाशन) पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक

```यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:
जोतीराव गोविंदराव फुले```
*✺◈◈◈◈✺●★MSP★●✺◈◈◈◈✺*

【 _*पश्चात प्रभाव (लीगसी)*_ 】


```महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.```


```पिंपरी-चिंचवड महापालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर १९५५ साली आचार्य अत्रे यांनी ’महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. जोतिबांच्या जीवनावर ’असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.```


```जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय सहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.```

*✺◈◈◈◈✺●★MSP★●✺◈◈◈◈✺*

           ⭐  _*समारोप*_  ⭐


_विद्याध्यायनासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,_


_त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास•_


_परि स्त्री शिक्षण; हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास_


```या उक्तीप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दांतच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.








*😘..प्रे र णा..✍*

"प्रेरणा घ्या नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या, ज्यांच्या हाती फक्त शुन्य होते..."

🌸 *डाँ.ए.पी.जे.अब्दुल कलाम* 🌸
 वडील नावाडी होते. विद्यार्थीदशेत असताना ते वर्तमानपत्र विकत होते. 
ते शास्त्रज्ञ झाले राष्ट्रपती झाले.

🌸 *शेक्सपिअर* 🌸
 खाटीकखान्यात नोकरी करत होते. रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभळता सांभळता एका नाटककाराचा जन्म झाला..


🌸 *ग. दि. माडगूळकर* 🌸
मँट्रिक नापास झाल्यावर उदबत्त्या विकल्या. अनवाणी आयुष्य जगले. त्यांनी गीतरामायण लिहिले..

🌸 *गुलजार* 🌸
फाळणी नंतर दिल्लीला आले.मोटार गँरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. बिमल राँय भेटले .मोटार गँरेजमधले आयुष्य फिल्म इंडस्ट्रित आले...

🌸 *सुधिर फडके*🌸
चहा भाजीचा व्यापार करत होते .प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्य विकावी लागली . 
भटकंतीतून त्यांना सुर शोधला. ते गायक झाले, संगीतकार झाले ....

🌸 *नीळू फुले* 🌸
पुण्याला काँलेमध्ये अकरा वर्षे माळी होते. झाडांची निगराणी करता करता ते राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले. नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला माहीत झाले...

🌸 *विष्णूपंत छञे* 🌸
घोड्याच्या पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वताःच स्वताःचा मार्ग शोधला. भारतातील पहिली ग्रेट सर्कस निर्माण केली ...

🌸 *दारा सिंग* 🌸
पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते. रानात गुरं चरायला जात होते. गुरांना सांभाळता सांभाळता कुस्तीची आवड निर्माण झाली. जगभर कुस्त्या जिंकल्या. चित्रपटात कामे केली.  राज्यसभेत खासदार म्हणून जाताना मनात एकच भावना होती , एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला...

🌸 *एम. एफ. हुसेन*🌸
मुंबईच्या फुटपाथवर सीनेमाची पोस्टर्स रंगवली. पुढच्या आयुष्यात त्यांची चित्रे शंभर कोटींना विकली गेली. भारतात चिञकलेच्या इतीहासात एक नवा विक्रम नोंदवला गेला....

🌸 *कर्मवीर भाऊराव पाटिल* 🌸
कंदिल आणि नांगराचे विक्रेते होते. कंदिल नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली ....

🌸 *ग्रेटा गार्बो*🌸
गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला. तेराव्या वर्षी गरीबीमुळे शाळा सोडावी लागली. दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असताना अचानक हाँलीवुडचे दरवाजे उघडले ....

🌸 *चार्ली चँपलिन* 🌸
प्रचंड गरिबी अनुभवली विद्यार्थीदशेत फुले विकण्यापासुन अनेक कामे केली. आपल्या विनोदाने जगभरच्या लोंकाना हसवले...

🌸 *सुशीलकुमार शिंदे* 🌸
सोलापूरला कोर्टात शिपाई होते. 
कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले....

🌸 *लक्ष्मणनराव किर्लोस्कर* 🌸
दहा वर्षे ड्राईंग टिचर होते. त्यांनी नांगराचा कारखाना निर्माण केला ..

🌸 *यशवंतराव गडाख*🌸
अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते. मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले वयाच्या पंचविशीत सोनाईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली ....

🌸 *धिरुभाई अंबानी* 🌸
वडिल प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते. भाऊ रेशनिंग आँफिसात नोकरीला होता. स्वताः ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी करत होते. 
अशा वातावरणात स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले ....

🌸 *स्टीव्ह जाँब्स*🌸
कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवावे लागले. जगातल्या मोठ्या काँम्प्युटर कंपन्यापैकी एक 'अँपल'
ची स्थापना केली....

🌸 *सुनील दत्त* 🌸
रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले....

🌸 *जाँनी वाँकर* 🌸
बस कंडक्टर होता. प्रवाशांची तिकीटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकिटे लोंकानी घ्यायला सुरुवात केली. एका तिकीटाचा प्रवास दुसऱ्या तिकीटावर स्थीरावला....

🌸 *महेमूद* 🌸
ड्रायव्हर होता. चलतीका नाम गाडी, सबसे बडा रुपया त्याने म्हणायला सुरुवात केली आणि गाडीचे व्हील हातातून केव्हा निसटून गेले ते स्वताःलाही समजले नाही.....

"या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शुन्य होते . त्यांनी अथक परिश्रमाने शुन्यातून विश्व निर्माण केले. अनवाणी आयुष्याला आकार दिला, परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या माणसापुढे आदर्श ठेवला ..  
तुम्हीसुध्दा शुन्य असताना स्वताःचे स्वतंत्र व्यक्तीमत्व निर्माण करु शकता....."

*"आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा नाहीतर..?*
*दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल"..!*




   *धन्यवाद..!!*

No comments:

Post a Comment