Pages
- Home
- माझा परिचय
- स्वनिर्मित शैक्षणिक विडियो
- CCRT Delhi
- शालेय अभिलेखे
- आकर्षक रांगोळया
- सहज , सोपे उपक्रम
- इ. १ ली ते ७ वी मूल्यमापनाच्या नोंदी.
- मराठी बालगीते
- महाराष्ट्रातील किल्ले
- खूले रंगमंच
- सामान्यज्ञान
- महाराष्ट्र शासन निर्णय
- आपली संस्कृती
- ५ वी व ८वी शिष्यव्रुत्ती अभ्यासक्रम
- योगासने
- इ १ ली ते ८ वी पाठय पुस्तके
- थोरांची ओळख
- प्रसिद्ध लेख
- शालेय उपक्रम
- ठळक घडामोडी
- रोबोटिक्स कोडींग
Friday, 31 March 2017
Thursday, 9 March 2017
जागतिक महिला दिन
महिला दिन विशेष....सावित्रीच्या लेकीनी उचलला शिक्षणातलं तंत्रविश्व व्यापक करण्याचा विडा
येवल्यातील सहा प्राथमिक शिक्षिकां अध्यापनात देताय डिजिटल योगदान
संतोष विंचू / सकाळ वृत्तसेवा
येवला,ता. ७ : नारी जातीची थोरवी या दुनियेने गायिली,अनेक रूपे तुझीच ही याच दुनियेने पहिली या निव्वळ गाण्याच्या ओळीच नाही तर तमाम महिलांची हि थोरवी आपण सर्वांनीच अनुभवली आहे. तालुक्यातील गावाकडची अनेक चिल्ले-पिल्ले विध्यार्थी अन त्यांना ज्ञानाची शिदोरी देणारे गुरुजी व मॅडमही सक्रियतेने योगदान देणाऱ्या अश्याच पाच सवित्रींच्या लेकिंच्या आगळ्या-वेगळ्या कार्याचा अनुभव घेत आहे. होय,वेगळ यासाठी कि महिला शिक्षिकांनी शाळेत जावे, अध्यापन करावे अन घर सांभाळावे या त्रिसूत्रीच्या बाहेर पडत या सावित्रीच्या लेकीनी स्वत टेक्नोस्वी होत विध्यार्थ्यासह सहकाऱ्यांना तंत्रसाक्षर बनवण्याचा विडा उचलला आहे.
रामायणात सीता,महाभारतात देवकी,शिवबा घडवणारी माता जिजाबाई,स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लाऊन लढलेली झाशीची राणी लक्ष्मिबाई अन स्री शिक्षणाची कवाडे उघडी करणाऱ्या सावित्रीबाई फुले अशी अनेक उदाहरणे आहेत कि जिथे प्रतीकुल परिस्थितीला अनुकूल करण्याचे काम स्त्रियांनी केले आहे. अर्थात हे वाचण्या इतके सोपे नाही तर बरेच कठीण प्रसंग आणि अथक परिश्रम व चिकाटी त्यासाठी असावी लागते. असाच काहीसा प्रत्यय तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांत अध्यापनाचे काम करणाऱ्या सीमा गायकवाड,आशा पगारे,अनिता शिरोळे,मनिषा सोनवणे,
शीला चव्हाण,सीमा जाधव या शिक्षिकांनी शिक्षण क्षेत्रापुढे ठेवला आहे. आपण का मागे राहवे असा विचार करून सुमारे ४५० शिक्षिकातून या पाच जणी पुढे आल्या असून आता इतरांना प्रक्षीक्षण देऊन त्यांनी तंत्र विश्व व्यापक करण्यासाठी योगदान दिले आहे.
गायकवाड यांनी केली सुरुवात
धामणगांव शाळेतील शिक्षिका सीमा गायकवाड यांनी तालुक्यात पहिला स्वनिर्मित बालमित्र या नावाने युट्यूब चॅनेल व बालमित्र या नावानेच ब्लानिर्मिती करून तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर करता हे शिद्ध केले आहे.तंत्रज्ञानाची उपयुक्तता साधनांच्या परिणामकारक वापरावर अवलंबून आहे.म्हणूनच शंभर टक्के वर्ग प्रगत करण्यासाठी दैनंदिन अध्यापनाला तंत्रज्ञानाची सुयोग्य जोड त्यांनी दिली. स्वनिर्मित ऑडियो-विडियो,पीपीटी, विविध शैक्षणिक अप्स,आकर्षक कार्टून्स, थ्रीडी चित्रे,अनिमेशनचा वापर,मोबाइल व लॅपटॉप चा प्रत्यक्ष वापर याद्वारे विद्यार्थ्याना आनंददायी अनुभूती यातून मिळत आहे.इतर शिक्षकांना देखील अध्यापनात याची जोड मिळू लागली आहे.पाटोदा येथील शिक्षिका आशा पगारे तंत्रज्ञान अध्यापनात वापरतांना मोबाइल वर विविध शैक्षणिक वीडियो,पीपीटीच्या माध्यमातुन माहीती देत आहेत.इतर शाळांप्रमाणे आपली शाळा डिजिटल व्हावी यासाठी झटताना त्यांनी लोकसहभागातुंन शाळेसाठी प्रोजेक्टर मिळवला आहे.महिला प्रशिक्षक म्हणून त्या काम करत असून सहकाऱ्यांना ज्ञान देण्याचा अनुभव अतिशय प्रेरणा देणारा असल्याचे त्या सांगतात.
कोटमगाव खुर्द शाळेतील अनिता शिरोळे स्वतः शैक्षणिक पीपीटी तयार करून तसेच कविता डाऊनलोड करून विध्यार्थ्यांना सहजपणे समजेल अश्या भाषेत अध्यापन करतात.याच शाळेतील मनिषा सोनवणे तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर करतांना सुरूवातीला मोबाईलचा वापर करून विद्यार्थ्यांना कविता,गाणी ऐकवून कवितांच्या चाली शिकवल्यात.मुलांना शाळेची गोडी लागली.शाळा डिजीटल बनल्यानंतर संगणकातील ई-लर्निंगचा वापर करून शिकविलेल्या भागाचे तसेच अवघड भागाचे दृढीकरण सोपे केले.इमेल,पीपीटी तयार करणे,व्हिडीओ मेकिंगचे तंत्र शिकत असताना तंत्रस्नेही प्रशिक्षक होऊन महिलांना अधिक सक्षम करण्याचा मनोदय त्यांचा आहे
पाटोदा शाळेतील शीला चव्हाण यांना तंत्रज्ञानाची आवड असल्याने मोबाईलचा अध्यापनात वापर करत विविध शैक्षणिक अप्स वापरून मुलांपर्यंत ज्ञानाचे विश्व खुले केले.अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केल्यास गुणवत्तेत वाढ होते म्हणून तंत्रस्नेही होऊन नवनवीन गोष्टी शिकाल्या व शिकवल्याचे त्या अभिमानाने सांगतात.कोटमगाव खुर्द शाळेतील सीमा जाधव यांनी ईलर्निंगचा प्रभावी वापर करून शैक्षणिक डिजीटल चळवळ प्रभावीपणे चालवत आहेत.
प्रोजेक्टरवर मराठी व इंग्रजी व्याकरण, गणिताच्या प्राथमिक संकल्पना प्रभावीपणे शिकवतात तसेच मोबाइलचा अध्यापनात वापर करतात.

Tuesday, 7 March 2017
तंत्रस्नेही कार्यशाळा येवला
🖥📱🖥📱🖥📱🖥
*तालुका तंत्रस्नेही कार्यशाळा समारोप*
*चला तंत्रस्नेही शिक्षक बनूया...*
*स्मार्ट टिचर बनूया...*
आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल कॉम्प्यूटर इंटरनेट या गोष्टी मानवी जीवनाच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत.आज जे मोबाइल हेंडसेट व्यक्ति वापरतो तो 1969 साली चंद्रयान सोडण्याकरिता वापरण्यात आलेल्या सुपर कॉम्प्यूटर पेक्षा जास्त विकसित आहे.म्हणून आज प्रत्येक शिक्षकाने मोबाइल व कॉम्प्यूटर शिकणे किती गरजेचे बनले आहे हे यावरून लक्षात येते.
सध्याच्या विज्ञान _तंत्रज्ञानाच्या युगात प्राथमिक शाळांनी देखील उत्तुंग झेप घेतल्याचे दिसून येते.आपल्या प्राथमिक शाळा डिजिटलायझेशनच्या स्पर्धेत अव्वल स्थानी रहाव्यात म्हणून तंत्रस्नेही शिक्षक अविरत झटत आहेत.त्याचेच एक द्योतक म्हणून तंत्रस्नेही कार्यशाळांकडे पाहता येईल.विद्या प्राधिकरण नाशिक(डायट) व शिक्षण विभाग पंचायत समिती येवला आयोजित तंत्रस्नेही कार्यशाळेचा समारोप २ मार्च रोजी झाला.दि.27/02/2017 ते 02/03/2017 पर्यंत दोन टप्प्यात सदर कार्यशाळा शासकीय आश्रमशाळा बाभूळगाव ता.येवला जि.नाशिक येथे हसतखेळत पार पडली.कार्यशाळेसाठी एकूण 97 प्रशिक्षणर्थ्यानी आपला सहभाग नोंदवला.
'एकच ध्यास तंत्रज्ञानातून विकास' या उक्तिस अनुसरून ध्येयवेडा प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणात दिसून आला.
तज्ञ मार्गदर्शकांची तळमळ व त्याहून प्रशिक्षणार्थ्यांचा तंत्रज्ञानाप्रति उत्साह ही या कार्यशाळेची वैशिष्ट्ये होती.
या कार्यशाळेस तज्ञ मार्गदर्शक म्हणून
श्री.गजानन उदार,श्री.राकेश बेडसे,
श्री.शांतीनाथ वाघमोडे,श्रीम.आशा पगारे
श्रीम.सीमा गायकवाड,श्रीम.अनिता शिरोळे,श्रीम.मनीषा सोनवणे,श्रीम.शीला चव्हाण यांनी काम पाहिले
तर तांत्रिक सहकार्य श्री.अशोक रेड्डी,
श्री. मुजावर सर,श्री.कुलकर्णी सर,
श्री.संदेश झरेकर यांचे लाभले.
सदर कार्यशाळेत जी मेल अकाउंट उघडणे, गूगल फॉर्म तयार करणे,गूगल ड्राइव चा वापर,ऑनलाइन टेस्ट तयार करणे,QR कोड तयार करणे व ते रीड करणे,कविता व शैक्षणिक विडियो निर्मिती,पीपीटी निर्मिती, विविध शैक्षणिक apps चा वापर, GIF फाइल,यू टयूब चॅनेल व ब्लॉग क्रिएशन इ.तंत्रज्ञानाशी निगडित गोष्टी शिकविन्यात आल्या.
श्री.खारके साहेबांनी(प्रशिक्षण प्रमुख विद्या प्राधिकरण नाशिक) त्यांचा प्राथमिक शिक्षकापासून ते जेष्ठ अधिव्याख्याता(वर्ग 1) पर्यंतचा प्रेरणादायक प्रवास हसतखेळत सर्वासमोर मांडून प्रशिक्षणाला एक आगळीच रंगत आणली.
तालुक्यातील सर्वच शाळांतुंन डिजिटल शिक्षणाचे वारे वाहू लागले आहे.
आपले सर्व शिक्षक बांधव तंत्रज्ञानाप्रति कृतियुक्त होण्यासाठी नक्कीच प्रयत्न व्हावा व त्याचा उपयोग विद्यार्थ्याना दिशादर्शन व्हावा हिच अपेक्षा

Subscribe to:
Posts (Atom)