🖥📱🖥📱🖥📱🖥
*तालुका तंत्रस्नेही कार्यशाळा समारोप*
*चला तंत्रस्नेही शिक्षक बनूया...*
*स्मार्ट टिचर बनूया...*
आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल कॉम्प्यूटर इंटरनेट या गोष्टी मानवी जीवनाच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत.आज जे मोबाइल हेंडसेट व्यक्ति वापरतो तो 1969 साली चंद्रयान सोडण्याकरिता वापरण्यात आलेल्या सुपर कॉम्प्यूटर पेक्षा जास्त विकसित आहे.म्हणून आज प्रत्येक शिक्षकाने मोबाइल व कॉम्प्यूटर शिकणे किती गरजेचे बनले आहे हे यावरून लक्षात येते.
सध्याच्या विज्ञान _तंत्रज्ञानाच्या युगात प्राथमिक शाळांनी देखील उत्तुंग झेप घेतल्याचे दिसून येते.आपल्या प्राथमिक शाळा डिजिटलायझेशनच्या स्पर्धेत अव्वल स्थानी रहाव्यात म्हणून तंत्रस्नेही शिक्षक अविरत झटत आहेत.त्याचेच एक द्योतक म्हणून तंत्रस्नेही कार्यशाळांकडे पाहता येईल.विद्या प्राधिकरण नाशिक(डायट) व शिक्षण विभाग पंचायत समिती येवला आयोजित तंत्रस्नेही कार्यशाळेचा समारोप २ मार्च रोजी झाला.दि.27/02/2017 ते 02/03/2017 पर्यंत दोन टप्प्यात सदर कार्यशाळा शासकीय आश्रमशाळा बाभूळगाव ता.येवला जि.नाशिक येथे हसतखेळत पार पडली.कार्यशाळेसाठी एकूण 97 प्रशिक्षणर्थ्यानी आपला सहभाग नोंदवला.
'एकच ध्यास तंत्रज्ञानातून विकास' या उक्तिस अनुसरून ध्येयवेडा प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणात दिसून आला.
तज्ञ मार्गदर्शकांची तळमळ व त्याहून प्रशिक्षणार्थ्यांचा तंत्रज्ञानाप्रति उत्साह ही या कार्यशाळेची वैशिष्ट्ये होती.
या कार्यशाळेस तज्ञ मार्गदर्शक म्हणून
श्री.गजानन उदार,श्री.राकेश बेडसे,
श्री.शांतीनाथ वाघमोडे,श्रीम.आशा पगारे
श्रीम.सीमा गायकवाड,श्रीम.अनिता शिरोळे,श्रीम.मनीषा सोनवणे,श्रीम.शीला चव्हाण यांनी काम पाहिले
तर तांत्रिक सहकार्य श्री.अशोक रेड्डी,
श्री. मुजावर सर,श्री.कुलकर्णी सर,
श्री.संदेश झरेकर यांचे लाभले.
सदर कार्यशाळेत जी मेल अकाउंट उघडणे, गूगल फॉर्म तयार करणे,गूगल ड्राइव चा वापर,ऑनलाइन टेस्ट तयार करणे,QR कोड तयार करणे व ते रीड करणे,कविता व शैक्षणिक विडियो निर्मिती,पीपीटी निर्मिती, विविध शैक्षणिक apps चा वापर, GIF फाइल,यू टयूब चॅनेल व ब्लॉग क्रिएशन इ.तंत्रज्ञानाशी निगडित गोष्टी शिकविन्यात आल्या.
श्री.खारके साहेबांनी(प्रशिक्षण प्रमुख विद्या प्राधिकरण नाशिक) त्यांचा प्राथमिक शिक्षकापासून ते जेष्ठ अधिव्याख्याता(वर्ग 1) पर्यंतचा प्रेरणादायक प्रवास हसतखेळत सर्वासमोर मांडून प्रशिक्षणाला एक आगळीच रंगत आणली.
तालुक्यातील सर्वच शाळांतुंन डिजिटल शिक्षणाचे वारे वाहू लागले आहे.
आपले सर्व शिक्षक बांधव तंत्रज्ञानाप्रति कृतियुक्त होण्यासाठी नक्कीच प्रयत्न व्हावा व त्याचा उपयोग विद्यार्थ्याना दिशादर्शन व्हावा हिच अपेक्षा

No comments:
Post a Comment