*वाचन प्रेरणादूत- श्री विक्रम अडसूळ (राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते तसेच ATM राज्यसंयोजक)*
📝 *ज्ञानदेव नवसरे*
आनंदाचा ,गोडव्याचा, समृद्धीचा ,समाधानाचा, कौतुकाचा,आभाराचा दिन हा
वाचन प्रेरणेचा.
भारताचे वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि राष्ट्रपती या सर्व पदावर काम करणारे थोर भारतीय ,प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण सर, पदवीधर शिक्षक रामेश्वर जाधव सर, संगिता गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.शाळा धामणगाव येथे वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत धामणगाव चे सचिव अडसरे भाऊसाहेब लाभले.
सीमा गायकवाड मॅडम यांच्या सुंदर फलकलेखनाने धामणगाव शाळेतील प्रत्येक कार्यक्रमाचे फलकलेखनाने कार्यक्रमाची शोभा वाढवित आलेल्या आहेत तसा आजही उत्कृष्ट फलकलेखन केले. आजच्या कार्यक्रमाला मान्यवरांच्या उपस्थितीने ,राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला ता कळंब जि उस्मानाबाद यांच्या पुस्तक भेटीने आणि हात धुवा दिनाच्या निमित्ताने त्याच्या प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणाने धामणगाव शाळेत वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांना आजच्या दिनी प्रेरणा मिळावी म्हणून एखाद्या प्रेरणादायी व्यक्तीचे मार्गदर्शन आपण घेऊयात असे धामणगाव शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सीमा गायकवाड यांनी सुचवले . आमच्या सर्व टीमने या उपक्रमाला होकार देत सकारात्मक प्रतिसाद नोंदविला. नम्रता जानराव मॅडम, राधिका चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांना काही शालेय ग्रंथालयातील पुस्तके खुली करत विद्यार्थी वाचनाकडे कटाक्षाने लक्ष देऊन होत्या.
व्यक्ती वाचन, लेखनाने आणि बुद्धिमान व्यक्तीच्या सानिध्यात माणूस समृद्ध होत असतो म्हणूनच म्हणतात ना,
One who reads, writes, sees, inquires, lives in the company of learned, his intellect expands as the lotus petals expands due to the rays of sun.
आम्हीही हाच उद्देश समोर ठेवून मुलांनी प्रश्न विचारावेत, बुद्धिमान माणसाच्या सानिध्यात राहता यावे ,मुलांना वाचनाची व लेखनाची प्रेरणा मिळावी यासाठी यावर्षी चे महाराष्ट्रातील एकमेव असणारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक तसेच महाराष्ट्रातील उपक्रमशील ,कृतिशील शिक्षकांना Active Teachers Maharashtra (ATM ) च्या माळेत गोवणारे ATM चे राज्यसमन्वयक मा.श्री विक्रम अडसूळ सर यांच्या सोबत जि.प.प्राथ.शाळा धामणगाव येथील शिक्षक अन विद्यार्थी यांना Zoom Meeting च्या माध्यमातून प्रेरणादायी, सकारात्मक आणि एकमेकांची शैक्षणिक ऊर्जा वाढविणारा संवाद साधता आला.
मला आणि सीमा गायकवाड मॅडम यांना
विक्रम अडसूळ सरांचा अगोदरपासूनच परिचय आहे पण धामणगाव च्या शाळेतील इतर शिक्षकांचा परिचय व्हावा म्हणून नवसरे यांनी सर्वांची ओळख करुन दिली.
आजच्या वाचन प्रेरणादिनी विक्रम सरांनी धामणगाव शाळेतील विद्यार्थ्यांना वाचन ,लेखन, शिस्त याबद्दल छान मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विक्रम सरांना लहानपणापासून आत्तापर्यंतचे अनुभव, कौटुंबिक, शैक्षणिक आणि समाजिक वातावरण ,पुरस्काराचा आनंद, वाचनाचा छंद ,अतीव सुख आणि दुखाचे क्षण असे अनेक प्रश्न विचारुन त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इयत्ता पाचवीच्या पूजाने सर मला शिक्षणासाठी दत्तक घ्यायला तुम्हाला आवडेल का? असे विचारल्यावर सरांनी ही सकारात्मक दाद दिली .
विक्रम सरांनी विद्यार्थी अन शिक्षकांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा देत वाचन करा,अभ्यास करा ,खुप मोठे व्हा अशा शुभेच्छा दिल्या.
आमचे मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण सरांनी विक्रम सरांसोबत पुरस्काराची पद्धती, पुरस्कारावरासाठीच्या बाबी आणि इतर बाबीवर सविस्तरपणे चर्चा केली.
सर्वांना जिंकून घेत विक्रम सरांनी आमच्या विद्यार्थी अन शिक्षकांसोबत साधलेला संवाद हा आमच्यासाठी दिशादर्शक असणार आहे .
धन्यवाद 🙏🏻

*जागतिक अहिंसा दिन*
*स्वच्छता एक संस्कार*
🖋 जि.प.शाळा धामणगाव ता येवला
जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव येथे जागतिक अहिंसा दिन ,लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.
यामध्ये स्वच्छता जनजागृती दिंडी काढण्यात आली .
स्वच्छता अभियानात सहभागी होतानाच
शालेय परिसर व शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता करण्यात आली .
आमचे मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण सर व मार्गदर्शक संगिता गायकवाड मॅडम यांनी स्वतः हातात झाडू घेऊन शालेय परिसर स्वच्छतेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा केला.
उपक्रमशील शिक्षिका सीमा गायकवाड मॅडम यांनी इंग्रजी मध्ये सुत्रसंचालन करत उपस्थितीतांची मने जिंकून घेतली.
विद्यार्थ्यांनी तसेच नवसरे यांनी दोन्ही महापुरुषांबद्दल भाषणे करत त्यांचा जीवनपट सर्वासमोर उलघडला.
आमचे मार्गदर्शक रामेश्वर जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच समाधान वाहूळ, SMC अध्यक्ष गिडगे ,शिक्षणप्रेमी थोरात तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडत असताना राधिका चव्हाण मॅडम, नम्रता जानराव मॅडम यांची खंबीर साथ लाभली.
धन्यवाद 🙏🏻
📝 *सुंदर हस्ताक्षर स्पर्धा* 📝
📝📝📝📝📝📝📝
🖋 *ज्ञानदेव नवसरे*
*जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव*
*ता -येवला, जि- नाशिक*
सुंदर हस्ताक्षर हा व्यक्तिमत्त्वाचा दागिना आहे असे म्हणतात कारण अक्षरांतून व्यक्तिमत्त्व दिसते. मी सुंदर दिसावे ,मी सुंदर असावे ;तसं माझे अक्षर सुंदर असावे असे प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटत असते आणि त्याचा प्रयत्नही तसाच असतो. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर चांगले असावे यासाठी विविध उपक्रम प्रत्येक शाळेवर घेतले जातात.
विद्यार्थ्यांना लेखन करताना स्वतः हस्ताक्षर ही सुंदर दिसत असते पण त्याचे मूल्यमापन होणे गरजेचे असते, हाच उद्देश समोर ठेवून जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव येथे मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण सर, पदवीधर शिक्षक रामेश्वर जाधव सर, संगिता गायकवाड मॅडम तसेच नम्रता जानराव मॅडम व ज्ञानदेव नवसरे यांच्या दिशादर्शनाखाली
*कर्मवीर भाऊराव पाटील*
*स्मृतिदिनानिमित्त*
📝 *सुंदर हस्ताक्षर स्पर्धा*
घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना इयत्ता चौथीच्या बालभारती च्या पाठ्यपुस्तकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरील प्रसंग सांगणारा मायेची पाखर या पाठातील परिच्छेद देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत स्पर्धेत सामील झाले.
*सौजन्य: आजच्या बक्षीस वितरणासाठी धामणगावातील शिक्षणप्रेमी चांगदेव जाधव यांनी विजयी विद्यार्थींना वह्या व पेन देत बक्षीसांचे वाटप केले.*
धन्यवाद 🙏🏻
*ज्ञानवंत होऊया*
📝 *ज्ञानदेव नवसरे*
जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव
ता - येवला, जि- नाशिक
विद्यार्थी जीवनात सामान्यज्ञानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.सामान्यज्ञान विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत करते.
सामान्य ज्ञानामुळे विद्यार्थी अभ्यासास प्रवृत्त होतात, नवीन माहिती मिळविण्यासाठी धडपड करतात.
विद्यार्थींची हीच धडपड गेल्या दोन महिन्यांपूर्वी जि.प.प्राथ शाळा धामणगावच्या मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण सर यांनी ओळखली आणि सामान्य ज्ञानाच्या प्रश्नावर आधारित ज्ञानवंत होऊया या उपक्रमाला सुरुवात केली.
*स्वतंत्र नोंदवही*
विद्यार्थ्यांच्या कृतींचे योग्य नियोजन केले तर विद्यार्थी विकासासाठी फायदाच होतो. जेवण झाल्यानंतरच्या मोकळ्या वेळेत जि.प.शाळा धामणगाव चे शिक्षक बांधव फळ्यावर दररोज पाच सामान्य ज्ञानाचे प्रश्न लिहितात. विद्यार्थी स्वतंत्र वहीत त्या प्रश्नांची नोंद घेतात.
*ज्ञानाचे दृढिकरण*
नोंद केलेल्या प्रश्नांचा अभ्यास व्हावा, विद्यार्थी त्यांना पुन्हा पुन्हा वाचावेत यासाठी दररोज परिपाठाला पाच प्रश्न विचारले जातात.
*मार्गदर्शन*
सामान्य ज्ञानाचे प्रश्न सराव, वाचनाचे फायदे , ज्ञानाचे दृढिकरण, उपक्रमातील सातत्य यासाठी आमचे पदवीधर शिक्षक रामेश्वर जाधव सर व संगीता गायकवाड मॅडम ,सीमा गायकवाड मॅडम, नम्रता जामराव मॅडम ,राधिका चव्हाण मॅडम , ज्ञानदेव नवसरे तसेच मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण सर विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
*सामान्यज्ञान परीक्षा*
आत्तापर्यंत विचारलेल्या सर्व प्रश्नांपैकी २० प्रश्न घेऊन ज्ञानदेव नवसरे यांनी सामान्य ज्ञान चाचणी तयार केली.
आज दिनांक १ सप्टेंबर रोजी जि.प शाळा धामणगाव येथील ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांची या सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची परीक्षा मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या उपक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती लावून शिक्षकांचे कौतुक केले.
या परीक्षेमध्ये एकूण तीन क्रमांक काढण्यात आले .
इ ६ वी च्या साईतेजने २० पैकी २० गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.
गावातील पालक, मुख्याध्यापक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले.
परीक्षा पार पडल्यानंतर विद्यार्थी बोलत होते, "टीचर, पुढच्या वेळी मी सर्व बरोबर उत्तरे लिहिणार."
यातच या उपक्रमाची दिशा आणि यशस्वीता स्पष्ट दिसत आहे.
धन्यवाद.🙏🏻
*आरोग्य व स्वच्छता कार्यक्रम*
🏃🏻♂🏃🏼♀🍃💐🍎🤾🏻♂🧘🏻♂🧘🏻♀
📝 *ज्ञानदेव नवसरे*
*जि.प.प्राथ.सेमी इंग्रजी शाळा धामणगाव*
*ता- येवला,जि-नाशिक*
*आरोग्य ही सुखी जीवनाची गुरूकिल्ली*
पावसाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त रोगराई वातावरणात थैमान घालते.आरोग्य म्हणजे फक्त औषधोपचार नाहीत तर सुखी, निरोगी अन निकोप जीवनाची गुरूकिल्ली आहे .आपले प्रकृती ठीक असेल तरच आपण शारीरिक ,मानसिक दृष्टी ठीक राहू त्यामुळे एखादी बाब करण्यासाठी उत्साह, हुरुप कायम ठेवता येतो. हाच उत्साह शिक्षक अन विद्यार्थ्यामध्ये कायम रहावा जोमाने काम करता यावे , जोमाने अभ्यास करणारे विद्यार्थी तयार व्हावेत यासाठी
धामणगाव शाळेचे दिशादर्शक मुख्याध्यापक श्री .राजेंद्र चव्हाण सर यांच्या विनंती ला मान देऊन डाॅ.वामनराव पैठणकर सर यांनी आज धामणगाव शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी उपस्थिती लावली.
श्री राजेंद्र चव्हाण सरांनी धामणगाव शाळेच्या वतीने स्वागत केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
डाॅ.वामनराव पैठणकर सरांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी *आरोग्य व स्वच्छता* या विषयावर संवाद साधला.
आई आपल्या घराची जशी काळजी घेते तशी आपण आपल्या शरीराची काळजी घ्यावी . केस, नखे, दात,त्वचा यांची स्वच्छता कशी असावी? त्याचे फायदे काय? अस्वच्छता असेल तर होणार दुष्परिणाम काय? घर स्वच्छतेसोबतच स्वतः ची अन शाळेची स्वच्छता कशी करावी याबद्दल विनोदीशैलीत मुलांसोबत एकरूप होत अगदी स्वतःच लेकरु होत अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.
पावसाळ्यातील रोगराई,डेंगू, मलेरिया, डासांचे प्रकार याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
डाॅक्टरांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत रोगांपासून कसे दूर राहता येईल याचा कानमंत्र आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिला.
धामणगावचे माजी सरपंच श्री अशोक थोरात यांनी डाॅ. पैठणकर सरांचे आभार व्यक्त केले.
आजच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यासोबत संवाद साधल्याबद्दल आमच्या शाळेतील शिक्षक वृंदांनी डाॅक्टर पैठणकर साहेबांचे आभार व्यक्त केले.
धन्यवाद 🙏🏻
*शालेय मंत्रिमंडळ निवडणूक*
📝 ज्ञानदेव नवसरे
जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव
*लोकशाहीचे शिक्षण देऊया*
*देशाचे रक्षण करुया*
याप्रमाणे आमच्या जि.प.प्राथ.शाळा धामणगाव येथे लोकशाहीच्या शिक्षणासाठी ,रक्षणासाठी अाणि लोकशाही पद्धतीने घडविले जाणारे मतदानाचा अनुभव, लोकप्रतिनिधी यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देण्यासाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक हा उपक्रम घेतला.
मतदान हा अधिकारच नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदान करा, फरक पडतो!
मतदान केल्याचा बोटावरील शाईचा "डाग' चांगला आहे! हा डाग तुम्हाला कलंकित नाही तर मानांकित करणार आहे. रात्रंदिवस धडपडणाऱ्या मतदान यंत्रणा अन् लोकशाहीला तुमचे मतदान अपेक्षित आहे. लक्षात ठेवा.. लोकशाहीचा आदर... देशाचा आदर. मतदान करा... सच्चा उमेदवार निवडा. प्रलोभनाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडून सशक्त समाज घडविण्यास योगदान द्या'' अशी अनेक वाक्य सुजाण नागरिक एकमेकांना सांगत असतात अाणि लोकशाही बळकट करत देशाचे रक्षण करत असतात. लोकशाहीचे हेच संस्कार देण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केला.
आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आमचे दिशादर्शक राजेंद्र चव्हाण सर यांना मुलांना लोकशाहीच्या शिक्षणासाठी ,मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या शालेय मंत्रीमंडळ निवडणूक उपक्रम घेण्यासंदर्भात सांगितले आणि सरांनी लगेच होकार दिला आणि तयारीला सुरुवात केली. आमचे मार्गदर्शक पदवीधर शिक्षक रामेश्वर जाधव सर व संगीता गायकवाड मॅडम यांनी हा उपक्रम अधिकाधिक परिणामकारक कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या गोपाळवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक नारायणदा मंगलारम सर यांनी त्यांच्या शाळेत हा उपक्रम घेतला होता ,त्यांच्या सहकार्याने जि.प.प्राथमिक शाळा धामणगाव शाळेच्या मंत्रीमडळ निवडणूकीसाठी लागणारे कच्चे साहित्य आणि मार्गदर्शन लाभले, त्याबद्दल नारायणदाचे आमच्या शाळेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो.
नारायणदा ने पाठविलेले गोपाळवाडीचे कच्चे साहित्य वापरून त्यांना धामणगाव शाळेच्या शालेय निवडणूकीचे स्वरूप देण्यात आले.
ज्ञानदेव नवसरे यांनी आठवडाभरापुर्वीच मुलांना आपण शालेय निवडणूक घेणार असल्याचे सांगितले होते.
उमेदवारी अर्ज दाखल करणे, चिन्ह वाटप,उमेदवारी अर्ज माघारी घेणे ,उमेदवार प्रचार, सभा घेणे ,त्यासाठी तयार केलेले फलक ,मतदान कक्ष, मतदान पेटी, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, मतदान करणे, बोटाला लागलेली शाही ,मतदान केल्याचा आनंद ,निकालाची उत्सुकता, विजयी झाल्याचा आनंद ,खातेवाटप ,जबाबदारी ची जाणीव हे सर्व घडत असताना मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण सर ,रामेश्वर जाधव ,संगीता गायकवाड ,ज्ञानदेव नवसरे, सीमा गायकवाड, नम्रता जानराव, राधिका चव्हाण हे शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन सगळे एकदा लिहिणे कठीणच आहे ,यासाठी एक सविस्तर लेख लिहितोय.
शालेय मंत्रीमडळ निवडणूकीसाठी आवश्यक मतदानपेटी तयार करण्यासाठी राधिका चव्हाण मॅडम, सीमा गायकवाड मॅडम यांनी कष्ट घेतले. नम्रता जानराव मॅडम ,ज्ञानदेव नवसरे,रामेश्वर जाधव सर यांनी मतदान कक्ष तयार केला. आम्हा सर्वांच्या मदतीला शाळेतील कृतिशील विद्यार्थी सोबतीला होतेच.
आम्ही सर्व शिक्षक बांधवांनी मतमोजणी करुन खातेवाटपाची तयारी केली.
सातवीच्या शिवानी सर्वात जास्त मते मिळवत शाळेच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाली.विजय धीवर, आश्विनी वाळुंज ,सचिन जेजुरकर, सार्थक पवार यांना अनुक्रमे सफाईमंत्री, आरोग्यमंत्री ,परिपाठ मंत्री, पर्यावरण मंत्री ही पदे मिळाली .
डोलताशांच्या गजरात गुलाल उधळत मुलांनी डान्स करत विजयाचा जल्लोष साजरा केला.
या विजयी उमेदवारांचे मुख्याध्यापक जाधव सर यांनी कौतुक आणि अभिनंदन करुन मार्गदर्शन केले.
पदवीधर शिक्षक रामेश्वर जाधव सर व संगीता गायकवाड मॅडम यांनी खातेवाटप करुन मुलांना शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठीच्या जबाबदारीची जाणीव करुन दिली.
सीमा गायकवाड मॅडम,राधिका चव्हाण मॅडम,नम्रता जामराव मॅडम ,ज्ञानदेव नवसरे यांनी विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप केले.
शालेय मंत्रीमंडळ निवडणूक अधिकारी ,मुख्याध्यापक राजेंद्र जाधव सर यांनी पद व गोपीनियतेची शपथ दिली.
धन्यवाद🙏🏻

No comments:
Post a Comment