शिक्षकांनी समजुन घ्यावे नविन बदली धोरण..
मुळसेवा 10 वर्ष पुर्णं असणारा प्रत्येक शिक्षक बदली पात्र...विशेष सुट 1 प्रमाणे बदली नको असल्यास घोषणापत्र द्यावे....विशेष सुट 2 प्रमाणे पती पत्नी 30 कि.मी.बाहेर असतील तर 30 मधील 20 शाळा मागा.मनाप्रमाणे शाळा न मिळाल्यास उपलब्ध शाळा घ्यावी लागेल....
30 च्या आत आहेत व बदलीपात्र यादीत नाव आहे तर 30 च्या आतील ईतर 20 विकल्प द्यावे लागतील...
अवघड क्षेत्रात 3 वर्ष सेवा असणारा परंतु मुळ सेवा 10 वर्ष नसेल तरीही तो बदली मागु शकतो....अशावेळी त्याची बदली अनिवार्य नाही कारण मुळ सेवा 10 पुर्णं नाही..20 शाळेतुन त्याला शाळा न मिळाल्यास त्याला बदली नाकारता येईल...
अवघड क्षेत्रात 3 वर्ष सेवा व मुळसेवा 10 वर्ष असणारा शिक्षक 20 विकल्प मागेल...त्यातुन त्याला शाळा न मिळाल्यास उपलब्ध शाळा घ्यावीच लागेल....बदली अनिवार्य.
सोपे क्षेत्रात मुळ सेवा 10 असणारा प्रत्येक जण बदली पात्र....बदली पात्र यादीत नाव असेल तर (जिल्हा सेवा जेष्ठ) 20 विकल्प शाळा द्याव्या. शाळा न मिळाल्यास उपलब्ध पैकी शाळा घ्यावीच लागेल...बदली अनिवार्य.
सोपे क्षेत्र मुळ सेवा 10 वर्ष पुर्णं पण बदली पात्र यादीत नाव नाही...तो विनंती बदली मागु शकतो.20 विकल्प द्या.मनाप्रमाणे न मिळाल्यास उपलब्ध शाळा मागा.तरीही न मिळाल्यास बदली नाकारता येईल.पुर्वीप्रमाणे विनंती बदली.
विनंती बदली सोपे क्षेत्र 10 वर्ष मुळ सेवा.
विनंती बदली अवघड क्षेत्र 3 वर्ष मुळ सेवा.
अनिवार्य बदली सोपे क्षेत्र 10 वर्ष मुळसेवा पण बदली पात्र यादीत नाव असावे.अनिवार्य बदली अवघड क्षेत्र 10 वर्ष मुळ सेवा व 3 वर्ष अवघड सेवा...
तालुका ठिकाणापासुन ठरावीक अंतराबाहेरील शाळा अवघड तर आतील शाळा सोपे क्षेत्र...
वरील प्रमाणेच पदवीधर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख बदल्या होतील...
10 वर्ष एकुण सेवा असणारा (सेवेत आल्या पासुन) प्रत्येक शिक्षक बदली पात्र...
क्रम...
विशेष शिक्षक 1 बदल्या
विशेष शिक्षक २ बदल्या
अवघड क्षेत्र(अनिवार्य बदल्या)
सोपे क्षेत्र(अनिवार्य बदल्या)
व शेवटी सोपे क्षेत्र विनंती बदल्या.
बदली होणेसाठी बदली पात्र यादीत नाव असणे गरजेचे...
नाव नसेल तर अवघड किंवा सोपे क्षेत्रातुन विनंती बदली मागु शकता...पण एकुण सेवा सोपे क्षेत्र 10 तर अवघड क्षेत्र 3 वर्ष पुर्णं असावी.
तालुका किंवा एका शाळेतील सेवेचा बदलीसाठी संबंध नाही.एकुण सेवा हाच निकष.
*जिल्हाअंतर्गत बदली संबंधी महत्वाचे*
*सर्वसाधारण क्षेत्र*:-
1 ) तालुका मुख्यालयापासून 25km अंतरावरच्या गावांतील सर्व शाळा.
*अवघड क्षेत्र*:-
1 ) तालुका मुख्यालयापासून 25km पेक्षा दूर अंतरावरच्या गावातील सर्व शाळा.
2 )तालुका मुख्यालयापासून 20km अंतरावरच्या गावातील शाळा पण तालुका/जिल्हा /राज्य मार्गापासून 5km पेक्षा जास्त आत ग्राम रस्त्याने जोडणा-या गावातील
सर्व शाळा.
3)अध्ययन अध्यापनास बोली भाषेमुळे अडचण येत असलेल्या गावातील शाळा पण तालुका मुख्यालयापासून 10km दूर अंतरावरच्या गावातील सर्व शाळा.
उदा.तांडा,इतर भाषिक समाजाच्या वाडी,वस्तीच्या शाळा.
4) तालुका मुख्यालयापासून 10km दूर अंतरावरच्या परंतू वाहतूकीची कोणतीही सोय नसलेल्या जेथे फक्त वैयक्तिक वाहनाने जावे लागतेआशा गावातील शाळा.
5)डोंगरी भागातील तालुका मुख्यालयापासून15km दूर अंतरावरच्या गावातील सर्व शाळा.
No comments:
Post a Comment